सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे यांची पत्रकार परिषद - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

🔊 बातमी ऐका

Thursday, July 16, 2026

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे यांची पत्रकार परिषद

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे यांची पत्रकार परिषद

यवतमाळ : दिल्ली येथील जंतर-मंतरवर पर्यावरणतज्ज्ञ व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक, अभिजित दीपके तसेच विद्यार्थी आंदोलकांकडून सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ गुरुवार, १६ जुलै २०२६ रोजी यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहात माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे आणि सामाजिक कार्यकर्ते दशरथ माडवी यांनी पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत ॲड. शिवाजीराव मोघे आणि दशरथ माडवी यांनी आंदोलनकर्त्यांना आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने सोनम वांगचुक व इतर आंदोलनकर्त्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून त्यांचे उपोषण समाप्त करण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी केली. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या १८ दिवसांपासून आंदोलन आणि उपोषण सुरू असतानाही केंद्र सरकार या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. तसेच आंदोलनकर्त्यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पत्रकार परिषद संपल्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu