वाहनावरील फायनान्स वादातून तरुणाची निर्घृण हत्या; यवतमाळ शहरात खळबळ - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Thursday, May 21, 2026

वाहनावरील फायनान्स वादातून तरुणाची निर्घृण हत्या; यवतमाळ शहरात खळबळ

वाहनावरील फायनान्स वादातून तरुणाची निर्घृण हत्या; यवतमाळ शहरात खळबळ



यवतमाळ : शहरातील रेणुका मंगल कार्यालयाजवळील घोडेराव चौक परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाचे नाव सचिन राठोड उर्फ “येडा” असे असून तो पाटील इंटरप्रायझेस नावाच्या सिझिंग एजन्सीसाठी काम करत होता. संबंधित एजन्सी पुणे येथील असल्याची माहिती समोर आली आहे. फायनान्स थकबाकी असलेली वाहने जप्त करून कंपनीच्या यार्डमध्ये जमा करण्याचे काम या एजन्सीकडून केले जात असल्याचे सांगितले जाते.



मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन राठोड याने एका फायनान्स थकित दुचाकी वाहनाला अडविले होते. यावेळी वाहनचालक आणि सचिन यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला आणि संतप्त झालेल्या दुचाकीस्वारांनी सचिनवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या सचिनचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. दरम्यान, सिझिंगच्या नावाखाली धामणगाव रोड व धामणगाव बायपास परिसरात काही टोळ्या सक्रिय असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या कामात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

स्थानिक नागरिकांनी अशा टोळ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करून अंकुश लावण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu