अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; वेणी येथील युवक गंभीर जखमी - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Thursday, May 21, 2026

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; वेणी येथील युवक गंभीर जखमी

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; वेणी येथील युवक गंभीर जखमी



महागाव (तालुका प्रतिनिधी, शेख नूर): गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास महागाव ते पुसद मार्गावर कसोला गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली. एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने वेणी येथील रहिवासी 28 वर्षीय कृष्णा गोविंद बोबले हे गंभीर जखमी झाले.



मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा गोविंद बोबले हे दुचाकी क्रमांक एमएच 29 बीक्यू 8868 ने महागावहून पुसदकडे जात असताना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना उपचारासाठी पुसद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.



दरम्यान, अपघात घडवून अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu