आर्णी तालुक्यातील इवळेश्वर येथे नाली बांधकामावर निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

🔊 बातमी ऐका

Thursday, July 16, 2026

आर्णी तालुक्यातील इवळेश्वर येथे नाली बांधकामावर निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप

आर्णी तालुक्यातील इवळेश्वर येथे नाली बांधकामावर निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप

मातीमिश्रित रेती, काँक्रीटऐवजी गोट्यांचा वापर; संबंधित विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आर्णी (प्रतिनिधी): आर्णी तालुक्यातील इवळेश्वर येथे सुरू असलेल्या नाली बांधकामाच्या कामावर निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या कामामध्ये मातीमिश्रित रेतीचा वापर केला जात असून, सिमेंट काँक्रीटच्या ऐवजी मोठ्या प्रमाणात गोटे टाकले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नाली बांधकामासाठी आवश्यक तांत्रिक निकषांचे पालन होत नसून, दर्जाहीन साहित्याचा वापर करून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रकारच्या बांधकामामुळे नाली अल्पावधीतच खराब होण्याची शक्यता असून, शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात काही नागरिकांनी असा आरोप केला आहे की, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, आर्णी यांच्या आशीर्वादानेच हे काम सुरू असून, संबंधित अधिकारी कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

ग्रामस्थांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून बांधकामाची गुणवत्ता तपासावी, दोषी आढळणाऱ्या कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच निकृष्ट दर्जाचे काम तात्काळ थांबवावे, अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu