यवतमाळमध्ये खळबळ! कौशल्य विकास विभागाच्या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार व शासनाची फसवणुकीचे गंभीर आरोप - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Tuesday, July 14, 2026

यवतमाळमध्ये खळबळ! कौशल्य विकास विभागाच्या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार व शासनाची फसवणुकीचे गंभीर आरोप

यवतमाळमध्ये खळबळ! कौशल्य विकास विभागाच्या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार व शासनाची फसवणुकीचे गंभीर आरोप

यवतमाळ | प्रतिनिधी : कौशल्य विकास, रोजगार व उद्योगता विभागातील मार्गदर्शन अधिकारी (गट-ब) म्हणून कार्यरत असलेल्या सौ. सीमा रामदास खिरोडकर यांच्या विरोधात शासनाची दिशाभूल, वैद्यकीय प्रतिपूर्तीमध्ये अनियमितता, स्थावर मालमत्ता खरेदीतील नियमभंग तसेच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत मुख्यमंत्री, अवर सचिव, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ही तक्रार उमरखेड येथील माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिक उत्तम गणपत वानखेडे यांनी केली असून, संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध सखोल चौकशी करून प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

तक्रारीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या आईच्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चाची प्रतिपूर्ती मिळवण्यासाठी शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आई स्वतःवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नसतानाही खोटी माहिती व कागदपत्रांच्या आधारे अंदाजे १.५० लाख रुपयांची वैद्यकीय प्रतिपूर्ती घेतल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

याशिवाय, वर्धा जिल्ह्यातील मलकापूर येथे शासनाची पूर्वपरवानगी न घेता शेतीजमीन खरेदी केल्याचा तसेच विक्रीपत्रात चुकीची माहिती देऊन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जमीन खरेदीसाठी बनावट कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक झाल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीत पुढे संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कामकाजाबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी झाल्याचा उल्लेख करण्यात आला असून, या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तक्रारीसोबत जमीन खरेदीचे विक्रीपत्र, सातबारा उतारा, फेरफार नोंदी आदी कागदपत्रे पुरावा म्हणून जोडण्यात आल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या तक्रारीतील आरोपांबाबत संबंधित अधिकारी किंवा विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu