कुपोषण निर्मूलनावरील संशोधनासाठी डॉ. सतीश कोडापे यांना पीएच.डी. - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Monday, July 13, 2026

कुपोषण निर्मूलनावरील संशोधनासाठी डॉ. सतीश कोडापे यांना पीएच.डी.

कुपोषण निर्मूलनावरील संशोधनासाठी डॉ. सतीश कोडापे यांना पीएच.डी.

यवतमाळ | प्रतिनिधी : यवतमाळ जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरणारी शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. सतीश कोडापे यांनी नोंदवली आहे. कुपोषण निर्मूलन या अत्यंत महत्त्वाच्या आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषयावर सखोल संशोधन करून त्यांनी रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ, रायसेन (मध्य प्रदेश) येथून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

डॉ. कोडापे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना, त्यांची अंमलबजावणी, परिणामकारकता आणि उर्वरित आव्हाने यांचा सखोल व विश्लेषणात्मक अभ्यास करून आपला संशोधन प्रबंध सादर केला. या संशोधनात कुपोषणाच्या सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक पैलूंचे सर्वंकष विश्लेषण करण्यात आले असून, भारतातील सामाजिक आरोग्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण अभ्यासांपैकी एक म्हणून या संशोधनाकडे पाहिले जात आहे.

हे संशोधन भोपाळ येथील संशोधन तज्ज्ञ व मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांनंतरही यवतमाळ जिल्ह्यात कुपोषणाची समस्या पूर्णपणे संपुष्टात आलेली नसल्याचे निरीक्षण या संशोधनातून समोर आले आहे. भविष्यात या समस्येवर अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी हे संशोधन मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

डॉ. सतीश कोडापे यांनी अत्यंत मेहनत, सातत्य आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून हे संशोधन पूर्ण केले असून त्यांच्या या यशामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्राला नवी ओळख मिळाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह मित्रपरिवार व हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu