महागाव तहसील प्रांगणातील सेतू केंद्रा जवळील खाजगी अर्जनिस टेबल हटविण्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Tuesday, July 7, 2026

महागाव तहसील प्रांगणातील सेतू केंद्रा जवळील खाजगी अर्जनिस टेबल हटविण्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन

महागाव तहसील प्रांगणातील सेतू केंद्रा जवळील खाजगी अर्जनिस टेबल हटविण्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन 

ता प्रतिनिधि शेख नुर शेख हैदर 

महागाव तहसील परिसरात सेतू केंद्रालगत लावण्यात आलेल्या खाजगी अर्जनिस टेबल तात्काळ हटविण्याची मागणी एकता पत्रकार संघ उपाध्यक्ष किशोर भीमराव राऊत यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे. प्रमाणपत्रे व विविध शासकीय कागदपत्रांसाठी येणाऱ्या नागरिकांकडून अनावश्यक शुल्क आकारले जात असल्याचा आरोप होत असून, या प्रकारामुळे नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सेतू केंद्राच्या खिडकीजवळच टेबल लावून अर्जनिस विविध अर्ज भरून देणे, कागदपत्रांची पूर्तता करून देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून अवाजवी पैसे घेत आहे अनेक लाभार्थ्यांना योग्य माहिती नसल्याने त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

याशिवाय, संबंधित ठिकाणी काही व्यक्ती मादक पदार्थांचे सेवन करत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे तहसील कार्यालयासारख्या सार्वजनिक ठिकाणचे वातावरण दूषित होत असून, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनाही अस्वस्थतेचा सामना करावा लागत आहे.

सेतू केंद्राच्या खिडकी समोरच टेबल असल्यामुळे प्रमाणपत्रे घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे. गर्दी, गोंधळ आणि गैरसोयीमुळे सेतू केंद्राच्या कामकाजावरही परिणाम होत असल्याचे तक्रार कर्त्याचे म्हणणे आहे.

किशोर राऊत यांनी तहसील प्रशासनाकडे संबंधित सेतू केंद्राजवळ खिडकीपाशीअसलेला अर्जनीस टेबल तातडीने हटविण्याची, लाभार्थ्याकडून कामासाठी जास्त प्रमाणात अनधिकृत वसुलीची चौकशी करण्याची तसेच सार्वजनिक ठिकाणी मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आता या संपूर्ण प्रकरणाची तहसीलदार दखल घेऊन योग्य ती कारवाई करणार का, असा प्रश्नन सर्वसामान्य नागरिकांकडून,व तक्रार कर्त्याकडून उपस्थित केला जात आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu