चिखली-मलकापूर येथील रेशन दुकानाचा प्रभार संजय जाधव यांच्याकडे; अपहारप्रकरणी कारवाईनंतर प्रशासनाचा निर्णय - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Monday, July 27, 2026

चिखली-मलकापूर येथील रेशन दुकानाचा प्रभार संजय जाधव यांच्याकडे; अपहारप्रकरणी कारवाईनंतर प्रशासनाचा निर्णय

चिखली-मलकापूर येथील रेशन दुकानाचा प्रभार संजय जाधव यांच्याकडे; अपहारप्रकरणी कारवाईनंतर प्रशासनाचा निर्णय

महागाव | प्रतिनिधी : शेख नूर शेख हैदर

महागाव तालुक्यातील चिखली-मलकापूर येथील संत ज्ञानेश्वर अपंग बचत गट संचलित रास्त भाव धान्य दुकानातील कथित गैरव्यवहाराबाबत रेशनकार्डधारकांनी केलेल्या तक्रारीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. चौकशीनंतर संबंधित दुकानात तब्बल ₹1 लाख 97 हजार 835 रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आल्याने संबंधितांवर महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

पुरवठा निरीक्षक मोहन कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली 21 जुलै रोजी संबंधित रास्त भाव धान्य दुकानाची सखोल तपासणी करण्यात आली. या तपासणीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्याने प्रशासनाने संबंधित दुकानाविरुद्ध कारवाई केली.

दरम्यान, चिखली-मलकापूर येथील रेशनकार्डधारकांना धान्य वितरणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तात्पुरता निर्णय घेत वाकान येथील रास्त भाव धान्य दुकानाचे अधिकृत डीलर संजय जाधव यांच्याकडे चिखली-मलकापूर येथील रेशन दुकानाचा अतिरिक्त प्रभार सोपविला आहे.

या निर्णयामुळे परिसरातील लाभार्थ्यांना नियमितपणे शासकीय धान्याचा पुरवठा सुरू राहणार असून, अपहारप्रकरणी संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu