उटी येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; संसारोपयोगी साहित्य जळून लाखोंचे नुकसान - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

🔊 बातमी ऐका

Thursday, July 16, 2026

उटी येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; संसारोपयोगी साहित्य जळून लाखोंचे नुकसान

उटी येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; संसारोपयोगी साहित्य जळून लाखोंचे नुकसान

ता. प्रतिनिधी : शेख नुर शेख हैदर

महागाव : तालुक्यातील उटी येथे गुरुवार, दि. 16 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4.30 वाजताच्या सुमारास घरातील विद्युत बोर्डामध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अनिता भारत आडे यांच्या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातील विद्युत बोर्डामध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणग्या उडाल्या. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण घराला वेढा घातला. आगीत फर्निचर, कपडे, धान्य, पलंग, घरगुती विद्युत उपकरणे तसेच इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

आग लागल्याचे लक्षात येताच घरातील सदस्यांनी तातडीने बाहेर पडून आरडाओरडा केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आग शेजारील घरांमध्ये पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात यश आले, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu