संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालयात रुग्णांना खिचडी, फळे व जीवनावश्यक साहित्याचे वाटप - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Sunday, July 5, 2026

संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालयात रुग्णांना खिचडी, फळे व जीवनावश्यक साहित्याचे वाटप

संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालयात रुग्णांना खिचडी, फळे व जीवनावश्यक साहित्याचे वाटप

दारव्हा | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त दारव्हा येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी खिचडी, फळे, बिस्किटे तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.

हा उपक्रम जर्रार कुरेशी व जहागीर ठेकेदार यांच्या पुढाकारातून, शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान रुग्णांची भेट घेऊन त्यांना अन्नसाहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि समाजसेवेचा संदेश दिला.

या प्रसंगी माजी आरोग्य सभापती एकनाथ महुरकर, माजी बांधकाम सभापती प्रकाश भाऊ दुधे, सुशील भाऊ राठोड, गजेंद्र चव्हाण, मंगेश भाऊ इंगोले, गजल भाऊ पवार, नय्यर भाई, इफ्तेखार कुरेशी, बिशार हाफी, जाहीर कुरेशी, साकीब रहेबर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाचे उपस्थित नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu