मौलाना अब्दुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालयातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Tuesday, July 7, 2026

मौलाना अब्दुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालयातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

मौलाना अब्दुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालयातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

पुसद, प्रतिनिधी, : पुसद येथील मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक खाजगी वाचनालय व राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषद यवतमाळ ज़िल्हा तर्फे दिनांक पाच जुलै रविवार रोजी ग्रँड पॅलेस वाशिम रोड पुसद येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस नेते डॉक्टर मोहम्मद नदीम हे होते तर मार्गदर्शक म्हणून माजी आमदार वजाहत मिर्झा उपस्थित होते तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नांदेड येथून आलेले मार्गदर्शक मोटिवेशनल स्पीकर अब्दुल बशीर मजीद प्रा.मोहम्मद जुबेर व पुसद येथील इं. सय्यद रेहान,सैफ सर आरीज कीदवाई सर होते.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रा. सदिक सर, सय्यद इस्तियाक, आलियार जनाब,मीर अकील सर,अनिस चव्हाण हसणेन अकिब सर एड. वसीम अहमद मुसद्दीक सर ललित सेता प्राध्यापक साजिद मिर्झा एडवोकेट तनवीर इत्यादी सह असंख्य पालक विद्यार्थी उपस्थित होते.

मौलाना अब्दुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय तर्फे वर्ग दहावी बारावी पदवी व पदवीत्तर तसेच पीएचडी प्राप्त करणारे प्राध्यापक नसीर शेख प्राध्यापक आवेज निर्बान व प्राध्यापक इबान जावेद खान इत्यादींचा शाल व श्रीफळ देऊन व स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला तसेच पुसद चे विधि्यार्थी ईईट(धनबाद )इथे उत्तीर्ण झालेले मोहम्मद उमर अब्दुल सत्तार यांचा समोरच स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला अमरावती विद्यापीठातून बीएससी तृतीय वर्षात सुवर्णपदक मिळविणारी ऊसरा फातिमा तसेच एम फॉर्म मध्ये गुणवत्ता यादी तृतीय क्रमांक पटकावणारे सकलेन खान इत्यादींचा पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, ऍड. प्रा. मिर्झा आदिल बेग ने केले. 

प्रवक्ता याने शिक्षण, मेहेनत, झिद्द, कठोर परिशरम करा असा सांगणियात आला.अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी उपस्थित विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले परिस्थिती कशीही असो त्यावर मात करून शिक्षण घ्यावे शिक्षणाशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास अशक्य आहे कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी तहेसीन खान,फिरोज खान, मोहम्मद अकिल सर, वासिक चव्हाण, गफार खान सर,नवाज अली,सिद्दीक लोहार, सकलेन खान, उमर खान,इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन तहसीन खान यांनी केले

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu