आर्णीत पैगंबरांविषयीच्या कथित आक्षेपार्ह विधानाविरोधात मुस्लिम समाजाचे निवेदन - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Wednesday, July 1, 2026

आर्णीत पैगंबरांविषयीच्या कथित आक्षेपार्ह विधानाविरोधात मुस्लिम समाजाचे निवेदन

आर्णीत पैगंबरांविषयीच्या कथित आक्षेपार्ह विधानाविरोधात मुस्लिम समाजाचे निवेदन

आर्णी | प्रतिनिधी : पैगंबरांविषयी सोशल मीडियावर कथितरीत्या करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आर्णी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने आर्णी पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले. संबंधित व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, सोशल मीडिया आणि काही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्यासाठी काही व्यक्ती धार्मिक भावना दुखावणारी आणि समाजात तेढ निर्माण करणारी विधाने करत आहेत. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी कोणत्याही धर्मातील श्रद्धास्थाने, महापुरुष किंवा धार्मिक व्यक्तिमत्त्वांविषयी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्यांविरुद्ध कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई व्हावी, तसेच समाजात द्वेष पसरविणाऱ्या चर्चा आणि वादग्रस्त कार्यक्रमांवरही योग्य नियंत्रण ठेवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. सुमारे १०३ मुस्लिम महिलांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. महिलांनीही धार्मिक भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

शेकडो मुस्लिम समाजबांधवांनी शांततापूर्ण व कायदेशीर मार्गाने आर्णी पोलीस ठाण्यात एकत्र येऊन प्रशासनाकडे निवेदन सादर केले. या वेळी महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक साजिद बेग, अशपाक शेख, काँग्रेसचे नगरसेवक सय्यद रियाज, एमआयएमचे तालुकाध्यक्ष अली खान, उपाध्यक्ष सुफी रिजवान, गजनवी शेख, शेख जुनेद, ॲड. नईम सय्यद, आसिफ चव्हाण, आमीन खान, अल्ताफ कुरेशी, इसरार कुरेशी, सोहेल चव्हाण, मतीन खान, शेख अरबाज, शाहरुख भाई, फारूक शेख, अनस शेख यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu