हादी ओरिएंटल अँड डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Wednesday, July 1, 2026

हादी ओरिएंटल अँड डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

हादी ओरिएंटल अँड डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

यवतमाळ (प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी हादी ओरिएंटल अँड डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले. शाळेचा परिसर रंगीबेरंगी फुगे, आकर्षक सजावट आणि स्वागत फलकांनी सजविण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

शाळेत प्रवेश करताच विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत नियमित अभ्यास, शिस्त, वेळेचे महत्त्व आणि नैतिक मूल्यांचे पालन करण्याचा संदेश दिला. दीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर मित्र-मैत्रिणींना भेटल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता.

या स्वागत सोहळ्याचे नियोजन आणि यशस्वी आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शाजिया सनोबर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यासाठी मिस सना मेराज, श्रीमती सलमा सय्यद, श्रीमती सनोबर खान, मिस फरहीन खान, मिस आलिया आणि मिस नगमा यांनी विशेष परिश्रम घेत विद्यार्थ्यांसाठी आनंददायी वातावरण तयार केले.

शाळेने राबविलेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागत उपक्रमाचे पालकांनीही मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात सकारात्मक वातावरणात झाल्याचे चित्र शाळेत पाहायला मिळाले.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu