विंग्स पब्लिक स्कूल, पांढरकवडा यांचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Monday, June 29, 2026

विंग्स पब्लिक स्कूल, पांढरकवडा यांचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

विंग्स पब्लिक स्कूल, पांढरकवडा यांचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

पांढरकवडा | प्रतिनिधी : आधुनिक शिक्षणासोबतच नैतिक मूल्ये व उत्तम संस्कारांची जपणूक करण्याचा ध्यास घेतलेल्या विंग्स पब्लिक स्कूल, पांढरकवडा या नव्या शैक्षणिक संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या सोहळ्यास पालक, विद्यार्थी, नागरिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरआन शरीफच्या तिलावतने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून शाळेचे उद्घाटन करण्यात आले.

या सोहळ्यास गेस्ट ऑफ ऑनर म्हणून श्री. काझी गझनफर अली खान, श्री. काझी ताजोद्दीन सर तसेच लोक विधान न्यूज पोर्टलचे मुख्य संपादक श्री. वासीक जुबेर शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षणाबरोबरच शिस्त, चारित्र्य, नैतिक मूल्ये आणि संस्कार यांचे महत्त्व ओळखून त्यांची जोपासना करावी, असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मिर्झा अतवार बेग, उपाध्यक्ष नसीर अली खान जाटू, सचिव शजर जहाँ अतवार बेग, संयुक्त सचिव मलेका खानम, सदस्य रियाज बेग इब्राहिम बेग तसेच शाळेचे मुख्याध्यापक मो. कमील मो. युसुफ यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. मिर्झा अतवार बेग यांनी संस्थेचे ब्रीदवाक्य "Education with Quality and Values" असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविणे हेच संस्थेचे उद्दिष्ट नसून, त्यांच्यामध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक जबाबदारी, शिस्त, चारित्र्य आणि उत्तम संस्कार रुजविणे हा संस्थेचा मूलभूत हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आधुनिक आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श नागरिक घडविण्याचा संस्थेचा दृढ संकल्प असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी शाळेत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक शैक्षणिक सुविधा, इंग्रजी माध्यमातून शिक्षण, संगणक शिक्षण तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, पालक आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले. विंग्स पब्लिक स्कूल, पांढरकवडा ही संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच उत्तम संस्कार देणारे एक आदर्श शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu