दारू पिण्यासाठी पैसे मागून मारहाण करणाऱ्या आरोपीस दोन वर्षांचा सश्रम कारावास - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Thursday, June 11, 2026

दारू पिण्यासाठी पैसे मागून मारहाण करणाऱ्या आरोपीस दोन वर्षांचा सश्रम कारावास

दारू पिण्यासाठी पैसे मागून मारहाण करणाऱ्या आरोपीस दोन वर्षांचा सश्रम कारावास

कळंब (यवतमाळ) : दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यानंतर नकार दिल्याच्या रागातून एका व्यक्तीवर बेलगाडीच्या लाकडी जुवाने हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

कळंब पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या या प्रकरणात आरोपी आकाश उर्फ गोलू मारोतराव नारनवरे (वय २८, रा. मोटोणा, ता. कळंब, जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ६६३/२०२२ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३२६, ३२४, ५०४ व ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरणातील फिर्यादीकडे आरोपीने दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने संतापाच्या भरात वाद घालत बेलगाडीच्या लाकडी जुवाने फिर्यादीच्या हात, पाय व छातीवर वार करून गंभीर दुखापत केली. याबाबत कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन तपास अधिकारी सपोनि/पीएसआय सुरेश झोटींग यांनी केला. तपासादरम्यान पुरावे संकलित करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे ९ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. तसेच वैद्यकीय पुरावे आणि अन्य साक्षी-पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे सिद्ध मानले.

प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी श्री. एच. एन. पोले यांनी आरोपीस भारतीय दंड संहितेच्या कलम ३२६ अंतर्गत दोन वर्षांचा सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता ॲड. आर. आर. त्रिवेदी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तसेच पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास व न्यायालयीन प्रक्रिया पार पडली.

या निकालामुळे गंभीर मारहाणीच्या गुन्ह्यांबाबत न्यायालयाचा कठोर संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu