घाटंजी-पांढरकवडा रोडवर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक गंभीर जखमी - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Monday, June 22, 2026

घाटंजी-पांढरकवडा रोडवर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक गंभीर जखमी

घाटंजी-पांढरकवडा रोडवर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक गंभीर जखमी

घाटंजी : घाटंजी-पांढरकवडा मार्गावरील नुक्ती गावाजवळ आज दिनांक 21 जून 2026 च्या मध्य रात्री एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. उमेेश गणपत भेंडारे (वय ३४) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेश भेंडारे हा युवक आपले काम आटोपून ॲक्टिव्हा दुचाकीने घरी परतत असताना, नुक्ती गावाजवळ मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्याला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, उमेश रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल नालीत जाऊन पडला.

अपघातानंतर जखमी युवक नालीत पडलेला असताना, रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने नगरसेवक निखिल देठे यांना फोनवरून माहिती दिली. निखिल देठे यांनी लगेच रुग्णसेवक मुज्जू पटेल व त्यांच्या मित्रपरिवाराशी संपर्क साधला. माहिती मिळताच मुज्जू पटेल आणि त्यांच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नालीतून जखमी उमेशला बाहेर काढून तातडीने घाटंजी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

उमेशच्या काही प्रमाणात नाकातोंडातून रक्तस्त्राव होत होता तर गंभीर मार लागल्यामुळे घाटंजी येथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी तातडीने यवतमाळ येथे रेफर करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मुज्जू पटेल यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून जखमीला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रवाना केले.

या घटनेची माहिती मुज्जू पटेल मित्रपरिवाराने घाटंजी पोलीस ठाण्याचे API सचिन राठोड यांना दिली. माहिती मिळताच API राठोड यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक मडावी, जमादार विनोद मेश्राम, नैताम मेजर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा पाठवला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, धडक देऊन फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा आणि त्याच्या चालकाचा शोध घाटंजी पोलीस घेत आहेत.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu