पत्नीने डोळ्यात टाकली मिरचीची पूड; पतीवर काठीने हल्ला, महागाव पोलिसांत गुन्हा दाखल - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Sunday, June 21, 2026

पत्नीने डोळ्यात टाकली मिरचीची पूड; पतीवर काठीने हल्ला, महागाव पोलिसांत गुन्हा दाखल

पत्नीने डोळ्यात टाकली मिरचीची पूड; पतीवर काठीने हल्ला, महागाव पोलिसांत गुन्हा दाखल

महागाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील सवना येथे कौटुंबिक वादातून पत्नीने पतीच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून काठीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शंकर धोत्रे (वय 32, रा. सवना, ता. महागाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांची पत्नी राधिका संतोष धोत्रे हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घटनेच्या दिवशी (शनिवार दिनांक 20 जून 2026 रोजी)  दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास फिर्यादी संतोष धोत्रे यांनी पत्नीला ती कोणाशी मोबाईलवर बोलत आहे, अशी विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वाद वाढल्यानंतर आरोपी पत्नीने संतापाच्या भरात फिर्यादीच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्यामुळे त्यांना काहीच दिसेनासे झाले आणि डोळ्यांमध्ये तीव्र जळजळ सुरू झाली.

त्यानंतर आरोपी महिलेने लाकडी काठीने मारहाण करून दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एवढ्यावरच न थांबता तिने जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीवरून महागाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 352 आणि 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक वादाचे रूप हिंसक संघर्षात बदलल्याची चर्चा सुरू आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu