महागावात एफडीएची धडक कारवाई; प्रतिबंधित गुटखा जप्त - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Tuesday, June 16, 2026

महागावात एफडीएची धडक कारवाई; प्रतिबंधित गुटखा जप्त

महागावात एफडीएची धडक कारवाई; प्रतिबंधित गुटखा जप्त

महागाव,(तालुका प्रतिनिधी : शेख नूर शेख हैदर) : महागाव शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला. शहरातील शेख सद्दाम यांच्या राहत्या घरावर टाकलेल्या छाप्यात सुमारे ₹26 हजार 600 किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. या कारवाईमुळे परिसरातील गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महागाव परिसरात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे विभागाच्या पथकाने गुप्त पडताळणी करून नियोजनबद्ध कारवाई केली. त्यानंतर शेख सद्दाम यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला.

छाप्यादरम्यान विविध कंपन्यांच्या प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला. पथकाने पंचनामा करून अंदाजे ₹26,600 किमतीचा माल जप्त केला. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच इतर लागू तरतुदींनुसार पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महागाव शहरात अनेक दिवसांनंतर झालेल्या या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागरिकांनी जिल्ह्यातील प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया नियमितपणे राबविण्याची मागणी केली आहे.

एफडीएच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही प्रशासनाने अशाच कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाया कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणातील पुढील कायदेशीर अथवा प्रशासकीय कारवाईबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाली नव्हती.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu