महागाव पोलीस ठाण्यात ठाणेदार धनराज निळे यांना भावपूर्ण निरोप - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Sunday, June 7, 2026

महागाव पोलीस ठाण्यात ठाणेदार धनराज निळे यांना भावपूर्ण निरोप

महागाव पोलीस ठाण्यात ठाणेदार धनराज निळे यांना भावपूर्ण निरोप

महागाव, दि. ७ जून २०२६ | प्रतिनिधी : शेख नूर शेख हैदर : महागाव पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष व जनसामान्यांमध्ये लोकप्रिय ठरलेले ठाणेदार धनराज निळे यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम आमोल राठोड यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.

यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी धनराज निळे यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरी, कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रियता आणि जनतेप्रती असलेली संवेदनशील भूमिका यांचा विशेष गौरव केला.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून निळे यांच्या नेतृत्वाखाली महागाव पोलीस ठाण्याने केलेल्या विविध उपक्रमांचा व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

समारंभाच्या शेवटी उपस्थितांनी त्यांच्या पुढील सेवाजीवनासाठी शुभेच्छा व्यक्त करत भावपूर्ण निरोप दिला. आनंद, कृतज्ञता आणि भावनांनी ओथंबलेल्या वातावरणात हा निरोप समारंभ संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu