यवतमाळ विधानपरिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Monday, June 1, 2026

यवतमाळ विधानपरिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

यवतमाळ विधानपरिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल


यवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून यवतमाळची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून विविध नावांची चर्चा सुरू होती. मात्र शिवसेनेने माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनाच उमेदवारी देत सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे.

यवतमाळ विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावळी शिवसेनेचे पक्षिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा राज्याचे मूद व जलसंधारण मंत्री आणि यवतमाळचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्यासह शिवसेनेचे जिल्हातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शिवसेनेचे पश्चिम विदर्भ सहसंपर्क प्रमुख पराग पिंगळे, खेतानी फाऊंडेशनचे सलीम खेतानी, शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर काका मोहोड, जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब दौलतकार, यवतमाळ जिल्हाप्रमुख तथा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजुदास जाधव, जिल्हाप्रमुख यशवंत पवार व जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu