धारदार शस्त्राने हल्ला करणारा आरोपी अटकेत; एलसीबीची जलद तपासमोहीम यशस्वी - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Sunday, May 31, 2026

धारदार शस्त्राने हल्ला करणारा आरोपी अटकेत; एलसीबीची जलद तपासमोहीम यशस्वी

धारदार शस्त्राने हल्ला करणारा आरोपी अटकेत; एलसीबीची जलद तपासमोहीम यशस्वी


आर्णी : शहरातील शिवाजी नगर परिसरात घडलेल्या गंभीर हल्ला प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलिस दलाच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मे 2026 रोजी रात्री उशिरा जखमी रमेश मिठाळे (वय 50, रा. शिवाजी नगर, यवतमाळ) हे श्री. पवन जयराम यांच्या देशी दारू दुकानात मॅनेजर म्हणून काम करीत होते. रात्री दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना एक अज्ञात इसम तेथे आला. दुकान बंद असल्याचे सांगितल्याने आरोपीने संतापाच्या भरात वाद घालत रमेश मिठाळे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पोटावर व पाठीवर गंभीर जखमा झाल्या.

घटनेनंतर पोलिस ठाणे आर्णी येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 441/26 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 109(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती देण्याच्या सूचना दिल्या.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती तसेच गोपनीय खबर्‍यांकडून माहिती संकलित केली. या तपासातून आरोपीची ओळख तोफिक रफिक शाहा (वय 22, रा. गिरोली, ता. मानोरा, जि. वाशीम) अशी पटली. आरोपी घटनेनंतर परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला आर्णी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे व त्यांच्या पथकाने पार पाडली. या कारवाईत स.पो.नि. पवन राठोड, गजानन राजमल्लु, पो.उप-निरीक्षक. शिवशंकर कायंदे, पोलीस अंमलदार बबलु चव्हाण, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, सोहेल बेग, अमित झेंडेकर, पवन ढवळे, रुपेश पाली, आकाश सुर्यवंशी, देवेंद्र होले, जितेंद्र चौधरी यांनी सहभाग घेतला.

या कारवाईमुळे गंभीर हल्ला प्रकरणाचा अल्पावधीत उलगडा झाला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu