राष्ट्रशक्ती फिल्म प्रोडक्शनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी मतीन तमन्ना यांची निवड - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Sunday, May 31, 2026

राष्ट्रशक्ती फिल्म प्रोडक्शनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी मतीन तमन्ना यांची निवड

राष्ट्रशक्ती फिल्म प्रोडक्शनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी मतीन तमन्ना यांची निवड


यवतमाळ, प्रतिनिधी : राष्ट्रशक्ती फिल्म प्रोडक्शन, मुंबईच्या यवतमाळ जिल्हा शाखेच्या विशेष कार्यकारिणी निवड सभेत ज्येष्ठ समाजसेवक व कला क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व मतीन तमन्ना यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. हा निवड सोहळा यवतमाळ येथील बिरसा मुंडा सांस्कृतिक भवन, वाघापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

राष्ट्रीय अध्यक्ष रवी भोंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सभेला दारूबंदी अभियानाचे प्रवक्ते व समाजसेवक उमेश मेश्राम, जिल्हाध्यक्ष राजकुमार गुप्ता यांच्यासह अनेक पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.


मतीन तमन्ना यांनी कला, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून देशातील अनेक नामवंत कलाकारांशी त्यांचे स्नेहसंबंध आहेत. चित्रपट व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांना विशेष मानाचे स्थान असल्याने त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले. निवडीनंतर उपस्थितांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

आपले मनोगत व्यक्त करताना मतीन तमन्ना म्हणाले की, “राष्ट्रशक्ती फिल्म प्रोडक्शनचे कार्य आज जरी सुरुवातीच्या टप्प्यात असले, तरी भविष्यात ही संस्था मोठ्या वटवृक्षाप्रमाणे विस्तारेल. यवतमाळच्या भूमीतून सुरू झालेली ही कलाचळवळ राज्यभर आणि देशभर पोहोचेल, असा मला विश्वास आहे.”

सभेच्या अध्यक्षीय भाषणात उमेश मेश्राम यांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल आशावाद व्यक्त केला. “ज्यांचा निर्धार दृढ असतो, त्यांच्यासाठी कोणतेही ध्येय अशक्य नसते. राष्ट्रशक्ती फिल्म प्रोडक्शनचा हा प्रवास निश्चितच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचेल,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष रवी भोंगाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.

जिल्हाध्यक्ष राजकुमार गुप्ता यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही दिली. “माझ्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी मी निष्ठेने पार पाडेन. संस्थेच्या प्रत्येक सदस्याशी स्नेहपूर्ण संबंध ठेवत कलेचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करेन,” असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला प्रबोधनकार, कवी व गायक रमेशबाबू वाघमारे, हंसराज तलवारे, काशिनाथ गजभिये, सुधाकर धोंगडे, गजानन जडेकर, भीमदास नाईक, दीपक प्रधान, ज्योती बोपचे, संध्या राऊत, वनिता तलवारे, दिलीप बोरगमगार, गोविंद चव्हाण, किशोर भवरे, मंदा धोंगडे, दिनेश पाटील, मंगल मेश्राम, रसिका धोंगडे, आशिका धोंगडे, ममता गवारगुरु, लक्ष्मण भगत, संध्या भवरे, प्रगती इंगोले, रोहन पेंदोर यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन काशिनाथ गजभिये यांनी केले, तर हेमलता वैद्य यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu