सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम
श्रावणी हुंबाड शाळेत प्रथम; ७६ पैकी १३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण
लोक विधान/आर्णी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सन २०२५-२६ च्या एसएससी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. ८ मे) जाहीर केला. यामध्ये आर्णी तालुक्यातील सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलने यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
श्रावणी हुंबाड (शाळेत प्रथम)
94.60%
शाळेतील विद्यार्थिनी श्रावणी हुंबाड हिने ९४.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. दिव्यांशी गुप्ता आणि सान्वी भोयर यांनी प्रत्येकी ९४.२० टक्के गुण मिळवत संयुक्त द्वितीय क्रमांक मिळविला. श्रुती माहुरे हिने ९३.८० टक्के गुणांसह तृतीय, समीक्षा काकरवार हिने ९३.४० टक्के गुणांसह चौथा, तर त्रिशा चिंतावार हिने ९३.२० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला.
शाळेतील एकूण ७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. तसेच ३६ विद्यार्थ्यांनी ८५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले. ६७ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत गुणवत्ता श्रेणीत यश मिळविले, तर ७४ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. विशेष म्हणजे सर्वात कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यालाही ५६ टक्के गुण प्राप्त झाले आहेत.
श्रुती माहुरे (शाळेत तृतीय)
या यशाबद्दल मुख्याध्यापक डॉ. अशोक कोठारी यांनी गुणवत्ता यादीतील तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे, दोन्ही उपमुख्याध्यापिकांचे, मार्गदर्शक ट्रस्टीज व पालक संघ सदस्यांचे अभिनंदन केले. शाळेच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.






No comments:
Post a Comment