वैयक्तिक वादातून चारचाकी वाहन जाळले; मेमन कॉलनी परिसरातील घटना
लोक विधान/यवतमाळ : शहरातील अवधूतवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेमन कॉलनी, भोसा रोड परिसरात जुन्या वादातून एक महागडी चारचाकी गाडी जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी मोहम्मद मुबशीर मोहम्मद रफीक (वय २२ वर्ष) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ४:१५ वाजताच्या सुमारास आरोपी शहबाज खान शफीउल्ला खान (वय ३७ वर्ष, रा. अहेबाब सोसायटी) आणि शेख समीर शेख अस्लम (वय २० वर्ष, रा. अशोक नगर) या दोघांनी संगनमत करून फिर्यादीची महिंद्रा कंपनीची XUV500 W8 (क्रमांक MH 29 AD 5432) ही गाडी पेटवून दिली. या आगीत गाडीचे पूर्णतः नुकसान झाले असून फिर्यादीचे अंदाजे ६,५०,००० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अवधूतवाडी पोलिसांनी याप्रकरणी ३० एप्रिल रोजी रात्री गुन्हा दाखल केला असून आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३२६, ४९, ३(५) अन्वये कारवाई सुरू केली आहे.

No comments:
Post a Comment