सोन्याची मूर्ती देण्याच्या नावाखाली २० लाखांची फसवणूक; दोन आरोपींना अटक - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Saturday, May 2, 2026

सोन्याची मूर्ती देण्याच्या नावाखाली २० लाखांची फसवणूक; दोन आरोपींना अटक

सोन्याची मूर्ती देण्याच्या नावाखाली २० लाखांची फसवणूक; दोन आरोपींना अटक



लोक विधान/यवतमाळ : यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोन्याच्या मूर्तीचे आमिष दाखवून एका व्यक्तीला २० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. फिर्यादी अब्दुल सत्तार अब्दुल गफूर (वय ६१ वर्ष, रा. नवीन लालगुडा, वणी) यांना आरोपी लाईक अनवाज शेख कलीम (वय २५ वर्ष, रा. सावर, ता. बाभुळगाव) आणि आकाश कुमार यांनी गाठले. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला ३ किलो वजनाची सोन्याची मूर्ती देतो असे सांगून त्यांच्याकडून २० लाख रुपये घेतले. मात्र, प्रत्यक्ष व्यवहाराच्या वेळी आरोपींनी त्यांना पिवळ्या धातूची बनावट मूर्ती देऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना २९ एप्रिल रोजी कापरा ते लखमापूर फाटा दरम्यान घडली. ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी ३० एप्रिल रोजी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu