टेंभी येथे २० वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Friday, May 22, 2026

टेंभी येथे २० वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ

टेंभी येथे २० वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ



महागाव (महागाव तालुका प्रतिनिधी शेख नूर) : महागाव तालुक्यातील टेंभी येथे एका २० वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार, २२ मे रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आरती रामजी वारकड असे मृत तरुणीचे नाव असून, ती टेंभी येथील रहिवासी होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरती हिने अज्ञात कारणावरून आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले.



घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कैलास मुकाडे (बकल क्रमांक २३९१) करीत आहेत.दरम्यान, तरुणीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे टेंभी गावात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu