वर्दळीच्या ठिकाणाहून ६० हजारांची दुचाकी चोरीला - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Wednesday, May 6, 2026

वर्दळीच्या ठिकाणाहून ६० हजारांची दुचाकी चोरीला

वर्दळीच्या ठिकाणाहून ६० हजारांची दुचाकी चोरीला



उमरखेड : उमरखेड शहरात वाहन चोरांनी पुन्हा एकदा आपले डोके वर काढले असून, भरवस्तीत असलेल्या जनरल स्टोअर्ससमोरून एक दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे. फिर्यादी अशोक नारायण ठाकरे (५१ वर्षे, रा. कुपटी) हे ४ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास आपल्या वैयक्तिक कामासाठी उमरखेडला आले होते. त्यांनी आपली 'मोसा' कंपनीची दुचाकी (क्रमांक एम एच २९ सी ए ८३४८) वर्धमान जनरल स्टोअर्ससमोर उभी केली होती. मात्र, अवघ्या काही वेळातच अज्ञात चोरट्याने या दुचाकीचे लॉक तोडून ती चोरून नेली. जेव्हा अशोक ठाकरे परत आले तेव्हा त्यांना आपली ६० हजार रुपये किमतीची गाडी जागेवर दिसली नाही. त्यांनी परिसरात खूप शोध घेतला, मात्र गाडीचा पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून शहरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu