मध्यस्थी करायला गेलेल्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Wednesday, May 6, 2026

मध्यस्थी करायला गेलेल्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

 मध्यस्थी करायला गेलेल्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला



दारव्हा : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील लोही गावातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, दोन गटातील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तीन सदस्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. अशोक उत्तम इंगोले (५० वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांचा धाकटा भाऊ आणि गावातील मिलिंद मोहन सावळे यांच्यात वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी आणि आपल्या भावाची सुटका करण्यासाठी अशोक इंगोले तेथे गेले असता, आरोपी मिलिंद सावळे (२२ वर्षे), मुन्ना सावळे (२७ वर्षे) आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांनी संगनमत करून अशोक यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी हातातील लाकडी दांडक्याने अशोक यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला, ज्यामुळे ते रक्तबंबाळ झाले. केवळ अशोकच नव्हे, तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या वृद्ध वडिलांना आणि भावजयीला सुद्धा आरोपींनी लाकडी काठीने पायावर मारून जखमी केले. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता गुन्ह्याची नोंद केली असून, आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे लोही गावात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu