महाविद्यालयाचे ऑफिस फोडून संगणक साहित्याची चोरी - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Wednesday, May 6, 2026

महाविद्यालयाचे ऑफिस फोडून संगणक साहित्याची चोरी


महाविद्यालयाचे ऑफिस फोडून संगणक साहित्याची चोरी


महागाव : महागाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयात चोरट्यांनी धाडसी चोरी करत लाखो रुपयांचे शैक्षणिक साहित्य लंपास केले आहे. ही घटना १ मे ते ३ मे २०२६ या सुट्टीच्या कालावधीत घडली. महाविद्यालयाचे कर्मचारी निवृत्ती नामदेव पतंगे (३९ वर्षे) जेव्हा ४ मे रोजी महाविद्यालयात पोहोचले, तेव्हा त्यांना ऑफिसच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळले. आत जाऊन पाहिले असता कपाटातील आणि टेबलावरील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. चोरट्यांनी महाविद्यालयाच्या कार्यालयातील १६,८०० रुपये किमतीचा कॉम्प्युटर (CPU), ६,५०० रुपयांचा प्रिंटर, ४,००० रुपयांचा मॉनिटर आणि २,१५० रुपयांची युपीएस सिस्टीम असा एकूण २९,४५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. निवृत्ती पतंगे यांनी तात्काळ या घटनेची माहिती महागाव पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. शैक्षणिक संस्थेमध्ये शिरून अशा प्रकारे चोरी झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, रात्रीच्या वेळी महाविद्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu