जुन्या वादातून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Wednesday, May 6, 2026

जुन्या वादातून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण

जुन्या वादातून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण


सवना : महागाव तालुक्यातील सवना येथे जुन्या वादाची कुरापत काढून एका १९ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादी अनिल दत्ता देवकर (१९ वर्षे, रा. करंजखेड) हा ३ मे २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास सवना ग्रामपंचायत परिसरात उभा असताना, तेथील रहिवासी मंचक येलप्पा पवार (६० वर्षे) याने त्याला अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अनिलने विरोध केला असता, आरोपी मंचक पवार याने रागाच्या भरात हातातील लाकडी दांडक्याने अनिलच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात अनिलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाण केल्यानंतर आरोपीने "पुन्हा या भागात दिसलास तर तुला जीवे मारून टाकीन," अशी धमकीही दिली. या प्रकरणी अनिलने दिलेल्या जबाबावरून महागाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu