अवैध वाळू तस्करीवर पोलिसांचा छापा; ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Wednesday, May 6, 2026

अवैध वाळू तस्करीवर पोलिसांचा छापा; ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त

अवैध वाळू तस्करीवर पोलिसांचा छापा; ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त



राळेगाव : राळेगाव पोलिसांनी अवैध गौण खनिज तस्करी विरोधात मोठी मोहीम उघडली असून, मध्यरात्री केलेल्या कारवाईत वाळूने भरलेले दोन टिप्पर जप्त करण्यात आले आहेत. राळेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी मिलिंद रतीराम मडावी यांना २१ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५:४५ च्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की, कळंब रोडवरील राळेगाव चौफुलीवरून वाळूची अवैध वाहतूक होणार आहे. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून एम एच ४० बी एल ९३०६ आणि एम एच ३१ सी बी ९०८६ या क्रमांकाचे दोन टिप्पर अडवले. तपासणी केली असता, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना ६ ब्रास रेती चोरून नेली जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ८४,४५० रुपये किमतीची रेती आणि दोन्ही टिप्पर जप्त केले आहेत. या प्रकरणी बादल कवडू राठोड, प्रज्योत अतसिंग चव्हाण, सतीश महादेवराव सावसाकडे आणि उदय रमेश घाटी या चार आरोपींविरुद्ध चोरी आणि महसूल कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, यामुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu