ग्लोरियस इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा निकालात जलवा; बारावी १००% तर दहावी ९७.४३%
लोक विधान/यवतमाळ : ग्लोरियस इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सन २०२६ च्या एसएससी व एचएससी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचा गौरव वाढविला आहे. यावर्षी इयत्ता १२ वीचा निकाल १००% लागला असून इयत्ता १० वीचा निकाल ९७.४३% लागला आहे.
एसएससी बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये कु. अरिबा लतीफ शेख हिने ९५% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. झैना मरियम अल्ताफ खान हिने ८८.२०%, अक्सा उरोज शेख शाकिब व झारा फातिन मोहम्मद शकील जोया यांनी प्रत्येकी ८५.४०%, मुजम्मिल अहमद खान अकील अहमद याने ८४.८०% तर तकी अथर अब्दुल ताहेर शेख याने ८२.८०% गुण प्राप्त केले.
एचएससी बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये तसबिहा जुजी जहीर अहमद शाह हिने ७८.५०% गुण मिळवले. झुबिया जहीर अहमद शेख हिने ७१.६७% तर आयेशा कनीज मोहम्मद फारूक अन्सारी हिने ७०.३३% गुण मिळवून यश संपादन केले.
विद्यार्थ्यांचे हे यश त्यांच्या अथक परिश्रमाचे, शिक्षकांच्या समर्पित मार्गदर्शनाचे आणि संस्थेच्या व्यवस्थापनाच्या सातत्यपूर्ण सहकार्याचे फलित असल्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. संस्थेच्या व्यवस्थापनाने, मुख्याध्यापकांनी व सर्व शिक्षकवृंदाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


No comments:
Post a Comment