हादी स्कूलचा डबल धमाल! – दहावी आणि बारावीचा उत्कृष्ट निकाल, सर्व विद्यार्थ्यांचा शतप्रतिशत यशाकडे वाटचाल - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Monday, May 11, 2026

हादी स्कूलचा डबल धमाल! – दहावी आणि बारावीचा उत्कृष्ट निकाल, सर्व विद्यार्थ्यांचा शतप्रतिशत यशाकडे वाटचाल

हादी स्कूलचा डबल धमाल! – दहावी आणि बारावीचा उत्कृष्ट निकाल, सर्व विद्यार्थ्यांचा शतप्रतिशत यशाकडे वाटचाल



लोक विधान/यवतमाळ : हादी ओरिएंटल अँड डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, यवतमाळ या संस्थेने यंदा ही दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेचा नवा अध्याय लिहिला आहे. फेब्रुवारी ते मार्च 2026 दरम्यान घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, हादी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.

दहावीमध्ये विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी!

शालेय व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या परीक्षेत एकूण *40* विद्यार्थी बसले होते *रेवंत अरुण गेडाम आणि मीत रवि भूत* या दोघांनी सर्वाधिक *93%* गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या पाठोपाठ *निशांत मनोज जाधव नि 92.80%*, तर *हादिया मिर्झा अतवार बेग हिने 91.80%* गुणांसह अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला.



इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये.

सिद्धी निरज झोपे* (91.40%)

अंशू गोविंद इंगोले* (90.80%)

सानिध्य रवी खोडके*(90.60%), 

जिया तहूर अथर परवेज़* (87.60%)

मेहरोष मोहम्मद मेराज* (87.40%)

शहाज़ेब खान शाहिद खान* (86.80%)

अनवश अफरोज़ शेख* (86.20%) 

यांचा समावेश आहे.


बारावीच्या बॅचमध्ये 100% निकाल

हादी ओरिएंटल अँड डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, यवतमाळ या संस्थेच्या बारावीच्या बॅचचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन करत १००% निकालाची उज्ज्वल परंपरा सुरू ठेवली आहे.

फेब्रुवारी ते मार्च 2026 या कालावधीत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (HSC) बारावीच्या परीक्षेत सुद्धा या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.

यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे:

अज़वा जावेद खान– 73.17%

 अंशरा सिद्दीकी अफजल हुसैन – 66.83%

 मुष्फी फातिमा इमरान खान – 65.83%*

जव्वाद अहमद जहीर अहमद खान 64.00%

या विद्यार्थ्यांनी आपल्या कठोर परिश्रमांद्वारे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळवले आहे. 100% निकाल मिळवणं ही संस्थेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.


या घवघवीत यशामागे विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचे प्रामाणिक मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य हे मुख्य घटक ठरले आहेत.शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व संस्थेचे पदाधिकारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu