घरफोडी प्रकरणातील दोन आरोपी हैदराबाद येथून जेरबंद; 7.36 लाखांचा मुद्देमाल जप्त - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Friday, May 15, 2026

घरफोडी प्रकरणातील दोन आरोपी हैदराबाद येथून जेरबंद; 7.36 लाखांचा मुद्देमाल जप्त

घरफोडी प्रकरणातील दोन आरोपी हैदराबाद येथून जेरबंद; 7.36 लाखांचा मुद्देमाल जप्त



लोक विधान/यवतमाळ : उमरखेड पोलिसांच्या डिटेक्शन ब्रँचने (DB) घरफोडी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत दोन आरोपींना हैदराबाद (तेलंगणा) येथून अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ३६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वनिता गजानन मोहते (वय ३०, रा. राजापुर, ता. उमरखेड) यांनी पोलिस स्टेशन उमरखेड येथे तक्रार दाखल केली होती. फिर्यादी बाहेरगावी असताना अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. यामध्ये सुमारे ३ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.



या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी गुन्हा क्रमांक ६६८/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमान गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन ब्रँचचे प्रमुख पोउपनिरीक्षक सागर इंगळे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्यान आरोपी हैदराबाद येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मनोहर देवदास चव्हाण (वय ४६, रा. राजापुर, ता. उमरखेड) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीतील काही दागिने विक्री केल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच एक होंडा कंपनीची मोटारसायकल (MH-29-BA-8915) असा एकूण ७,३६,२०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली पोउपनिरीक्षक सागर इंगळे, पोलीस कर्मचारी दीपक, दिवाकर गिते, आकाश पवार, महेश डिव्हे, सचिन टोंडेकर आदींच्या पथकाने केली. पुढील तपास पोउपनिरीक्षक सागर इंगळे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu