यवतमाळच्या शाहजेब खानचे एसएससी परीक्षेत घवघवीत यश
लोक विधान/यवतमाळ : भोसा रोड यवतमाळ येथील न्यू लाईफ एजन्सी अँड मेडिकलचे संचालक शाहेद खान यांचा सुपुत्र शाहजेब खान याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एसएससी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
हादी अँड डायमंड हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या शाहजेबने दहावी परीक्षेत एकूण ४३४ गुण प्राप्त करत ८६.८० टक्के गुण मिळविले. विशेष म्हणजे त्याने गणित विषयात ९६ तर विज्ञान विषयात ९५ गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली.
त्याच्या या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, नातेवाईक तसेच मित्रपरिवाराकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. शाहजेबच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

No comments:
Post a Comment