शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई : 34 गोवंशीय बैलांची सुटका, 26.80 लाखांचा मुद्देमाल जप्त - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Wednesday, May 13, 2026

शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई : 34 गोवंशीय बैलांची सुटका, 26.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई : 34 गोवंशीय बैलांची सुटका, 26.80 लाखांचा मुद्देमाल जप्त


लोक विधान/शिरपूर : शिरपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने गोवंशीय जनावरांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत 34 बैलांची सुटका केली असून सुमारे 26 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 13 मे 2026 रोजी रात्री मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर–चारगाव चौकी परिसरात नाकाबंदी करण्यात आली. यावेळी शिरपूर रोडवरून येणाऱ्या संशयित अशोक लेलँड कंटेनर वाहनाला थांबवून तपासणी केली असता, वाहनामध्ये 34 गोवंशीय बैल एकमेकांना दोऱ्यांनी घट्ट बांधलेल्या अवस्थेत आढळले.


वाहनचालकाकडे जनावरांच्या वाहतुकीसंबंधी कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याने अधिक चौकशी करण्यात आली. चौकशीत ही जनावरे तस्करीसाठी नेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून सर्व बैलांची सुटका केली तसेच वाहनासह मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणात संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 (सुधारित 2015), प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंधक अधिनियम तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu