जिद्द, चिकाटी आणि 17 तासांचा 'एकांतवास'; यवतमाळची कन्या वैष्णवी नाईक बनली 'क्लास वन' अधिकारी - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Wednesday, May 13, 2026

जिद्द, चिकाटी आणि 17 तासांचा 'एकांतवास'; यवतमाळची कन्या वैष्णवी नाईक बनली 'क्लास वन' अधिकारी

जिद्द, चिकाटी आणि 17 तासांचा 'एकांतवास'; यवतमाळची कन्या वैष्णवी नाईक बनली 'क्लास वन' अधिकारी



लोक विधान/यवतमाळ : "यश हे वारशाने मिळत नाही, तर ते स्वकष्टाने खेचून आणावे लागते," याचाच प्रत्यय यवतमाळच्या एका सामान्य कुटुंबातील मुलीने दिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( mpsc ) नगर रचना विभाग परीक्षेत वैष्णवी विनोद नाईक हिने देदीप्यमान यश संपादन करत थेट 'क्लास वन' राजपत्रित अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. अवघ्या 25 व्या वर्षी तिने मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वैष्णवीचे हे यश केवळ नशिबाचा भाग नसून, त्यामागे तिची अफाट मेहनत आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा कारणीभूत आहे. स्पर्धा परीक्षेच्या युगात जिथे अनेक तरुण गोंधळलेल्या स्थितीत असतात, तिथे वैष्णवीने अत्यंत स्पष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. नगर रचना विभागात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने अभ्यासाला सुरुवात केली.



स्वतःला केले 'रुम'मध्ये बंद
या परीक्षेच्या तयारीसाठी वैष्णवीने जे बलिदान दिले, ते आजच्या पिढीसाठी थक्क करणारे आहे. अभ्यासात कसलाही अडथळा येऊ नये म्हणून तिने व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियापासून स्वतःला पूर्णपणे तोडून घेतले होते.

 दिवसभर केवळ पुस्तकं आणि नोट्स

दिवसाचे तब्बल 16 ते 17 तास तिने अभ्यासासाठी समर्पित केले होते. मित्र -मैत्रिणींचे कार्यक्रम, सण-उत्सव, फिरणे आणि मनोरंजनाचे सर्व मार्ग बंद करून तिने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते. तिच्यासाठी तिची अभ्यासाची खोलीच तिचे जग बनले होते

 यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा

वैष्णवी विनोद नाईक हिने मिळवलेले हे यश केवळ तिचे वैयक्तिक यश नसून ते यवतमाळ जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. राजपत्रित अधिकारी म्हणून तिची निवड झाल्याने प्रशासकीय सेवेत आता एका कर्तबगार आणि मेहनती तरुण अधिकाऱ्याचा प्रवेश झाला आहे. तिच्या या यशामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक विद्यार्थिनींना प्रेरणा मिळाली आहे

 कुटुंबाचा पाठिंबा आणि आनंद

आपल्या मुलीने मिळवलेल्या या यशाने वडील विनोद नाईक आणि संपूर्ण नाईक कुटुंब भारावून गेले आहे. मुलीने घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. "मुलीने जे कष्ट घेतले, त्याचे फळ आज तिला मिळाले आहे," अशा शब्दांत तिच्या आईने आपला आनंद व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu