विठाळा येथे अवैध गांजा साठा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Monday, June 8, 2026

विठाळा येथे अवैध गांजा साठा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विठाळा येथे अवैध गांजा साठा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

यवतमाळ | प्रतिनिधी : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील विठाळा येथे स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एका इसमाकडून अवैधरित्या साठवून ठेवलेला गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 8 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे API पवन राठोड, PSI कायंदे, हेड कॉन्स्टेबल सोहेल मिर्झा, बबलू चव्हाण, मिथुन जाधव, किशोर झेंडेकर, पोलीस कॉन्स्टेबल अमित झेंडेकर तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल कुमरे यांनी दिग्रस पोलीस स्टेशन हद्दीत विशेष मोहिम राबविली.

यावेळी ग्राम विठाळा येथील दिलीप शंकर मसे (वय 38 वर्षे) याच्या राहत्या घराची पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान घरात अवैधरित्या साठवून ठेवलेला अंदाजे 2 किलो 475 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी सदर अमली पदार्थ जप्त केला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्यानुसार दिग्रस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अवैध अमली पदार्थांच्या विरोधात यवतमाळ पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू असून या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu