अकोला बाजार येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Sunday, May 31, 2026

अकोला बाजार येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अकोला बाजार येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


अकोला बाजार, प्रतिनिधी : वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकोला बाजार येथे एका ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. ३० मे) रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

मृत तरुणाचे नाव मनोज नामदेव नेवारे (वय ३५) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज हा दिवसभराची मजुरी करून घरी परतला होता. त्यावेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत त्याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. प्राथमिक माहितीनुसार, त्याने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.



घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी मोठ्या संख्येने मृतकाच्या घराकडे धाव घेतली. अकोला बाजारचे पोलीस पाटील मधुसूदन डाखोरे यांनी याबाबत वडगाव जंगल पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर एएसआय गणेश आगे व पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथे पाठविण्यात आला.



मनोज नेवारे हा मेहनती व सर्वसामान्य कुटुंबातील तरुण होता. रोजंदारीवर काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी त्याच्या आईचे कर्करोगाने निधन झाले होते. तसेच कोरोना काळात त्याच्या मोठ्या भावानेही आत्महत्या केली होती. सध्या त्यांचे वडील आजारपणामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. सततच्या कौटुंबिक संकटांचा सामना करीत असलेल्या या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या प्रकरणी वडगाव जंगल पोलीस पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu