दिग्रस शहरात बकरी ईद उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी
दिग्रस :दिग्रस शहरासह तालुक्यात ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद मोठ्या उत्साहात, शांततेत आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. दिग्रस-अर्णी रोडवरील देरवाडा येथे सकाळी हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन ईद-उल-अजहाची विशेष नमाज अदा केली. नमाजावेळी परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी हाफिज सद्दाम यांनी खुतबा पठण करत ईद-उल-अजहाचे धार्मिक महत्त्व उपस्थितांना सांगितले. त्यांनी त्याग, मानवता, बंधुभाव, शांतता आणि समाजातील ऐक्य टिकवून ठेवण्याचा संदेश दिला. तसेच देशात शांतता, सौहार्द आणि भाईचारा कायम राहावा यासाठी सर्वांनी विशेष दुआ करण्याचे आवाहन त्यांनी केले.
ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आयपीएस अधिकारी तेजस सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी उत्तम नियोजन केले. त्यांनी स्वतः नमाजस्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कार्यपद्धतीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
या प्रसंगी दिग्रसचे हाजी मुझ्झफ्फर सर, देरवाडाचे सरपंच नितीन इंगोले, पोलिस पाटील नाथूजी दत्ता चिकालकर, पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच रशीद बाबू शेख, वाजीद सलीम भाई शेख, जुबेर शेख, शारिख शेख, अहद शेख, शाहिद अन्सार, सुफियान, शोबान, सहजाद पापपू यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यवस्थापनासाठी विशेष मेहनत घेतली.
नमाजस्थळी स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि शिस्त याकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. दिग्रस व देरवाडा परिसरातील मुस्लिम बांधवांनी देशाच्या प्रगतीसाठी, सामाजिक ऐक्यासाठी तसेच सर्वधर्मीयांमध्ये प्रेम आणि भाईचारा कायम राहावा यासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली. ईद निमित्त एकमेकांना शुभेच्छा देत आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.



No comments:
Post a Comment