“मार्टि सुरू कधी होणार?” — अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा सवाल, यवतमाळात नाराजी तीव्र - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Monday, May 18, 2026

“मार्टि सुरू कधी होणार?” — अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा सवाल, यवतमाळात नाराजी तीव्र

“मार्टि सुरू कधी होणार?” — अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा सवाल, यवतमाळात नाराजी तीव्र



यवतमाळ : अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील प्रगतीसाठी स्थापन करण्यात आलेली महाराष्ट्र अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था (MRTI) अद्याप कार्यान्वित न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अल्पसंख्यांक विकास विभागाने २२ ऑगस्ट २०२४, १३ जानेवारी २०२६ आणि २३ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयांद्वारे मार्टि संस्थेची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात संस्थेची वेबसाईट, कार्यालय, कर्मचारी भरती, निधी वाटप आणि विविध योजनांची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही.

दरम्यान, सारथी, महाज्योती आणि अमृत या संस्थांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध योजनांच्या जाहिराती जाहीर करून अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, मार्टि सुरू नसल्यामुळे मुस्लिम, ख्रिश्चन, जैन आणि शीख या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे, मागील दोन वर्षांपासून अमृत संस्थेच्या लाभार्थी यादीतून या घटकांना वगळण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर महा मायनॉरिटी फॉर NGO – शाखा यवतमाळच्या वतीने जिल्हाध्यक्ष अतीक अफजल शेख यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये मार्टि संस्थेचे कामकाज तातडीने सुरू करावे, आवश्यक निधी उपलब्ध करून विविध योजना विद्यार्थ्यांसाठी खुल्या कराव्यात, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून शासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu