दिग्रस: आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये ६५.७४ लाखांचा सॉफ्टवेअर घोटाळा - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Sunday, May 3, 2026

दिग्रस: आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये ६५.७४ लाखांचा सॉफ्टवेअर घोटाळा

दिग्रस: आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये ६५.७४ लाखांचा सॉफ्टवेअर घोटाळा

लोक विधान/दिग्रस: दिग्रस येथील आरोग्यधाम क्रिटिकल केअर सेंटरमध्ये ६५ लाख रुपयांहून अधिक रकमेचा मोठा आर्थिक अपहार उघडकीस आला असून, याप्रकरणी सॉफ्टवेअरमधील तांत्रिक फेरफार आणि आयडी पासवर्डची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. संदीप रामरावजी दुधे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सुजल राजू नरपासे, उमेश विष्णुदास राठोड आणि इतर चार जणांनी २०२२ ते २०२५ या कालावधीत हॉस्पिटलच्या सॉफ्टवेअरचा गैरवापर केला.



त्यांनी रुग्णांकडून जमा झालेले पैसे स्वतःकडे ठेवून, सॉफ्टवेअरमध्ये जुन्या पावत्या रद्द (Cancel) करणे किंवा तारखा बदलणे अशा क्लृप्त्या लढवून एकूण ६५,७४,०४९ रुपयांची अफरातफर केली. दिग्रस पोलिसांनी आयटी ॲक्ट आणि बीएनएसच्या विविध कलमान्वये या हायटेक चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.



No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu