२५ हजारांची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक एसीबीच्या जाळ्यात - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Tuesday, May 19, 2026

२५ हजारांची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक एसीबीच्या जाळ्यात

२५ हजारांची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक एसीबीच्या जाळ्यात



यवतमाळ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ यांनी आज केलेल्या यशस्वी सापळा कारवाईत कळंब येथील भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक महिला कर्मचारीला २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी लोकसेविका श्रीमती शीतल विजयकुमार पांडे (वय ३७), पद – परिरक्षण भूमापक, भूमी अभिलेख कार्यालय, कळंब, जि. यवतमाळ यांनी तक्रारदाराकडून जमिनीच्या फेरफार नोंदीसंदर्भातील काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार हे कोठा (वेणी) शिवारातील शेती व प्लॉटची देखरेख करण्याचे काम करीत असून संबंधित प्लॉट मालक मृत झाले आहेत. त्यांच्या कायदेशीर वारसांची नावे फेरफार नोंदीमध्ये समाविष्ट करण्यासाठी तक्रारदार यांनी आरोपी महिला कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला होता. त्यावेळी संबंधित काम करून देण्यासाठी आरोपीने २५ हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली.

तक्रारीची पडताळणी १८ व १९ मे रोजी करण्यात आली असता, आरोपीने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज आयोजित सापळा कारवाईदरम्यान कळंब येथील भूमी अभिलेख कार्यालयात आरोपी श्रीमती पांडे यांनी तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर, पोलीस निरीक्षक मनोज ओरके, पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट तसेच एसीबीच्या पथकाने पार पाडली.

दरम्यान, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu