यवतमाळ : सराईत गुन्हेगाराकडून 53,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Monday, May 18, 2026

यवतमाळ : सराईत गुन्हेगाराकडून 53,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ : सराईत गुन्हेगाराकडून 53,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त



यवतमाळ : यवतमाळ शहरात वाढत्या घरफोडी व दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने महत्त्वाची कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून एकूण 53,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक कुमार चिंतांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे तपास करत आरोपी अक्षय दयाराम मसाराम (वय 28, रा. नेताजी नगर, यवतमाळ) याला ताब्यात घेतले. आरोपी हा दुचाकी चोरी व इतर मालमत्ताविषयक गुन्ह्यांत सक्रिय असल्याचे तपासात निष्पन्न झाले.



चौकशीदरम्यान आरोपीने अवधूतवाडी पोलीस स्टेशनअंतर्गत दाखल गुन्ह्यातील चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली 30,000 रुपये रोख रक्कम तसेच हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक MH 29 BX 1945) असा एकूण 53,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंत, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास अवधूतवाडी पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu