वडकी पोलिसांची पहाटेची धडक कारवाई! गोवंश तस्करीचा प्रयत्न फसला; 23.80 लाखांचा मुद्देमाल जप्त - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Monday, May 18, 2026

वडकी पोलिसांची पहाटेची धडक कारवाई! गोवंश तस्करीचा प्रयत्न फसला; 23.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

वडकी पोलिसांची पहाटेची धडक कारवाई! गोवंश तस्करीचा प्रयत्न फसला; 23.80 लाखांचा मुद्देमाल जप्त



वडकी (ता. राळेगाव) : वडकी पोलीस स्टेशन हद्दीत पहाटेच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत तब्बल 23 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.




18 मे 2026 रोजी पहाटे सुमारे 3.45 वाजताच्या सुमारास राळेगावकडून वडकीकडे गोवंश घेऊन जाणारे आयशर वाहन येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वडकी पोलिसांनी तत्काळ सापळा रचून वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन वळवून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी पाठलाग करत विहीरगाव परिसरात वाहन अडवण्यात यश मिळवले. यावेळी चालक अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 25 गोवंश (6 मृत व 19 जिवंत) आढळून आले.

या कारवाईत अंदाजे 3.80 लाख रुपये किमतीचा गोवंश व 20 लाख रुपये किमतीचे आयशर वाहन असा एकूण 23.80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिवंत जनावरांना तात्काळ उपचार देऊन गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 325 तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलमे 5, 5अ, 5ब आणि प्राण्यांवर क्रूरतेस प्रतिबंध अधिनियम कलम 11 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu