लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Thursday, April 30, 2026

लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण

लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण

आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती 



लोक विधान/यवतमाळ : जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे आज पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते आणि आदिवासी विकास मंत्री ना. प्रा.डॉ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.



या कार्यक्रमाला आ. किसन वानखेडे, नगराध्यक्ष ॲड. प्रियदर्शनी उईके, पोलीस अधिक्षक कुमार चिंता, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अधिक्षक अभियंता सुषमा बोंद्रे, लाप्रविचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.



यावेळी पालकमंत्री ना. संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री ना. प्रा.डॉ. अशोक उईके यांनी या सुसज्ज इमारतीचे कौतूक केले. शासनाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि लोकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांमध्ये शासन व विभागाची चांगली प्रतिमा निर्माण होण्यासाठी लोकसहभाग, लोकचळवळ आणि आपुलकी निर्माण झाली पाहिजे. यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा धाक कायम राहिला पाहिजे. जनजागृती झाली पाहिजे. शासकीय विभागाच्या इमारतींसाठी सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.



तत्पूर्वी पालकमंत्री ना. संजय राठोड, आदिवासी विकासमंत्री ना. डॉ. अशोक उईके यांनी नवीन इमारतीची पाहणी करुन वृक्षारोपण केले.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu