यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांसाठी अपघाती विमा योजनेत मोठी सुधारणा - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Thursday, April 30, 2026

यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांसाठी अपघाती विमा योजनेत मोठी सुधारणा

यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांसाठी अपघाती विमा योजनेत मोठी सुधारणा

सभासदांना ३० लाखांपर्यंत संरक्षण

लोक विधान/यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांसाठी चालू आर्थिक वर्षात अपघाती विमा योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांच्या तुलनेत सभासदांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढल्याने ही पावले उचलण्यात आली आहेत. पूर्वी दरवर्षी २ ते ३ इतका असलेला मृत्यूदर मागील आर्थिक वर्षात ९ पर्यंत पोहोचल्याचे निदर्शनास आले आहे.




या पार्श्वभूमीवर विमा कंपन्यांनी प्रीमियम दरात वाढ केल्याने यावर्षी विमा प्रीमियमही वाढविण्यात आला आहे. काही विरोधकांकडून याबाबत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला तरी ही वाढ वस्तुस्थितीवर आधारित असून सभासदांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

सभासदांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे आर्थिक संरक्षण लक्षात घेता यावर्षी ३० लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय योजनेत अंशतः व पूर्ण अपंगत्व, तसेच सभासदांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्याचा समावेश करण्यात आला असून या सुविधा मागील वर्षी उपलब्ध नव्हत्या.

तसेच विशेष सुविधा म्हणून, अपघात झाल्यास दवाखान्यातील उपचार, ऑपरेशन, रॉड बसविणे यांसाठी लागणारा खर्च विमा कंपनीमार्फत ३ लाख रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे. यामुळे सभासदांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

संस्था नेहमीच सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध असून भविष्यातही अधिक लाभदायक योजना राबविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अध्यक्ष महेश सोनेकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu