यवतमाळमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवीन इमारतीचा उद्या लोकार्पण सोहळा - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Wednesday, April 29, 2026

यवतमाळमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवीन इमारतीचा उद्या लोकार्पण सोहळा

लोक विधान/यवतमाळ : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नूतन प्रशासकीय इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा उद्या, गुरुवार दि. ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. टांगा चौक परिसरात उभारण्यात आलेल्या या नवीन इमारतीचे उद्घाटन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. संजय राठोड यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या नवीन प्रशासकीय वास्तूमुळे विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून, आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशा या इमारतीचे काम पूर्ण झाल्याने पोलीस दलात उत्साहाचे वातावरण आहे.




या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. प्रा. डॉ. अशोक उईके आणि उद्योग, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन व मृद व जलसंधारण राज्यमंत्री ना. श्री. इंद्रनील नाईक यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच खासदार संजय देशमुख, खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर, आमदार किरण सरनाईक, आमदार राजु तोडसाम, आमदार संजय रेठरेकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. प्रशासकीय स्तरावरून जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विक्रांत तिरमारे यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती असेल.


हा सोहळा यशस्वी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत. टांगा चौक येथील कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu