ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे २ मे रोजी अनावरण - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Tuesday, April 28, 2026

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे २ मे रोजी अनावरण

लोक विधान/यवतमाळ : विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने संचालित स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयात ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा उर्फ बाबूजी यांच्या पुतळ्याचे अनावरण शनिवार, दि. २ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. हा सोहळा जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालय गोधनी रोड यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला असून, यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे.

या कार्यक्रमात भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश न्यायमूर्ती अनिल किलोर, जिल्ह्याचे पालक न्यायाधीश न्यायमूर्ती वृशाली जोशी, न्यायमूर्ती नरेंद्र देशपांडे आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.



याशिवाय राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, उच्च शिक्षण संचालक (पुणे) डॉ. शैलेन्द्र देवळेकर, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य अ‍ॅड. आशिष देशमुख, आमदार बाळासाहेब मंगुलकर तसेच नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रियांशिनी उंडे यांची उपस्थिती राहणार आहे.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व लोकमत मीडिया समूहाचे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा राहणार आहेत. या प्रसंगी शहरातील नामांकित विधिज्ञ तसेच महाविद्यालयातील निवडक माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.


कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सीए प्रकाश चोपडा, प्राचार्य डॉ. विनोद मुनोत, अ‍ॅड. फिरोज मिर्झा व मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu