महागाव हद्दीत गावठी पिस्तूलासह युवक अटकेत; 31 हजारांचा मुद्देमाल जप्त - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Tuesday, June 9, 2026

महागाव हद्दीत गावठी पिस्तूलासह युवक अटकेत; 31 हजारांचा मुद्देमाल जप्त

महागाव हद्दीत गावठी पिस्तूलासह युवक अटकेत; 31 हजारांचा मुद्देमाल जप्त

महागाव प्रतिनिधी | शेख नूर : यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्रधारकांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) यवतमाळला मोठे यश मिळाले आहे. महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबोडा परिसरातून एका युवकाला गावठी बनावटीचे देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह अटक करण्यात आली. आरोपीकडून एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से.) यांच्या निर्देशानुसार जिल्हाभर अवैध धंदे, अवैध शस्त्र बाळगणारे तसेच गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, महागाव हद्दीतील आंबोडा गावाजवळील अतिथी हॉटेल परिसरात एक इसम देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन संशयास्पदरीत्या थांबला आहे.

माहितीची खातरजमा करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव रवि संतोष शिंगारे (वय 29), रा. धम्मनगर, श्रीरामपूर, ता. पुसद, जि. यवतमाळ असे सांगितले.

यानंतर आरोपीची झडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे देशी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी पिस्तुलाची अंदाजे किंमत 30 हजार रुपये, तर जिवंत काडतुसाची किंमत 1 हजार रुपये असल्याचे सांगितले. याप्रमाणे एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 320/2026 नोंद करण्यात आला असून आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महागाव पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहभाग घेतला.

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधातील पोलिसांची मोहीम आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu